बहुचर्चित ‘खतरों के खिलाडी 14’ चा नवा सिझन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या शोची शुटींग सध्या रोमानिया येथे सुरु आहे. एकापेक्षा एक स्टंट सेलिब्रिटींना या शोमध्ये करावे लागत आहेत. असेच या शो ची शुटींग सुरु असताना टीव्ही अभिनेता शालिन बानोट याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शालीनचा चेहरा पूर्ण सूजलेला दिसत आहे.
शालिनने शेअर केलेल्या व्हिडीओत शालीनचा सूजलेला चेहरा दिसत आहे. शालिन वैद्यकीय मदत घेताना दिसला. शालिनने तो व्हिडीओ शेअर करत शाहरुख खानचा सिनेमा कल हो ना हो चे गाणे लावलेले आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे खूणा दिसत आहे. शालीनने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहीले की, तुमच्यासाठी काहीपण !#kkk14. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे चाहतेही चिंतेत पडले असून तो लवकर बरा होण्याची प्रार्थना करताना दिसत आहे.
View this post on Instagram
पिंकविलाच्या वृत्तानुसार, शो मध्ये एक स्टंट करताना शालिन बानोट याला तब्बल 200हून अधिक विंचूंनी चावा घेतला. ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली आहे.