नाशिक : दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

590
drowned

शहरातील लळींग गावाशेजारी असलेल्या दगडी नाल्यावरील तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. हकीम मुहम्मद आणि अरबाज खान अशी या शाळकरी विद्यार्थ्यांची नावे आहेत. काही दिवसांपुर्वीच दहावीचा निकाल लागला. त्यात हे दोघे उत्तम गुण संपादीत करीत उत्तीर्ण झाले. बकरी ईद निमित्त फेरफटका मारत असतांना मित्रांसह दोघे या तलावावर पोहोचले होते. इतर तीन मित्र पोहोता येत नसल्याने तलावात उतरले नाहीत, त्यामुळे ते वाचले.

बकरी ईदनिमित्त मुस्लिम कुटूंबांकडून आनंद व्यक्त झाला आणि परस्परांना शुभेच्छाही देण्यात आल्या. परंतु शहरातील मौलवीगंज जवळ राहणार्या दोन कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ईदचे औचित्य साधुन या परिसरात राहणारी मुले लळींगजवळील दगडी नाल्यावर असलेल्या तलावापर्यंत गेले. तेथे गेल्यानंतर मुलांच्या मनात पोहोचण्याचा विचार आला. त्यातील हकीम मुहम्मद आणि अरबाज खान हे पोहोण्यासाठी खाली उतरले. परंतु, काठापासुन काही अंतरावरच तलावात खोल अंतर आहे. त्याचा अंदाज या दोघांना आला नाही. त्यामुळे दोनही जण तलावात खोलवर गेले. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केली. परंतु काठावर असलेल्या तीन मित्रांना पोहोता येत नसल्याने त्यांच्या मर्यादा पडल्या. दरम्यान पाण्यात पडलेल्या हकीम आणि अरबाजने परस्परांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघेही पाण्यात बुडले.

आपली प्रतिक्रिया द्या