Kitchen Cleaning Tips- काळपट पडलेली तांब्या, पितळेची भांडी होतील आता नव्यासारखी चकाचक! फक्त 5 रुपये करा खर्च

आपलं किचन म्हणजे एक भांडार आहे. यात केवळ अन्नपदार्थ शिजत नाहीत, तर यामध्ये असंख्य आठवणी सु्द्धा दडलेल्या असतात. म्हणूनच काही गृहिणी किंवा काही घरांमध्ये आजही तांब्या पितळेची भांडी आजही जपतात. तांब्या पितळेची भांडी कुणाची ना कुणाची आठवण म्हणून आपल्याला जपून ठेवलेली दिसतात. परंतु ही भांडी काळी पडल्यानंतर, घासून घासून हात दुखू लागतात. परंतु आता तांब्या पितळेची भांडीही अगदी नव्यासारखी चकाचक निघतील. यावर खर्च होणार आहे फक्त 5 रुपये.

पितळ, तांबे, स्टील आणि अॅल्युमिनियमची भांडी लिंबाच्या सालीने सहज स्वच्छ करता येतात. भांड्यांवरचा काळेपणा तर निघून जातोच पण तेलकट डागही निघून जातात. विशेषतः पितळेची भांडी इतकी काळी पडतात की, कितीही चांगला साबण वापरा किंवा लिक्विड वापरा ती साफ होतच नाहीत. वारंवार साफ केल्यानंतरही चमक परत येत नाही. या काळपट भांड्यावर हमखास उपाय आहे लिंबू. लिंबाची साल ही भांड्यावरील काळपटपणा काढण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. लिंबाची साल ही आपल्या घरातून म्हणूनच फेकून देऊ नका. कुठल्याही भांड्यांना चमकवण्यासाठी ही साल फार महत्त्वाची आहे.

लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे ते भांडी स्वच्छ करण्यात मदत होते. तसेच या लिंबाच्या सालीने आपण घरच्या घरी तांबे, पितळ, स्टील, अॅल्युमिनियम इत्यादी भांडी स्वच्छ करू शकतो. यामुळे जुना काळेपणा तर दूर होतोच पण भांड्यांमधील ग्रीसही पूर्णपणे नाहीसे होते.

आपल्या अनेकांच्या घरात अशी अनेक भांडी आहेत जी वर्षातून एकदा किंवा दोनदाच वापरली जातात. अशा परिस्थितीत ही भांडी काळपट, जुनाट दिसू लागतात. विशेषतः पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाची साल ही फार प्रभावी मानली जाते. लिंबाच्या सालीमुळे भांडी अगदी चकचकीत होतात एकदम नव्यासारखी.

कसे वापरावे:
लिंबू प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. मुख्य म्हणजे लिंबू कोणत्याही हंगामात बाजारात सहज उपलब्ध असते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबाचा वापर हा सर्रास होत असतो. अशावेळी लिंबू पिळून झाल्यानंतर, त्याची साल टाकण्यापेक्षा आपण ती साठवून ठेवायला हवी.

पिळलेल्या लिंबाच्या आतील भागाने भांडी सहजपणे घासता येतात. यामुळे भांड्यावरील काळेपणा हा आपोआप जातो. तसेच आपल्या हातांनाही कोणती एलर्जी होत नाही.