गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यातील लाखो भाविक कोकणात जात असतात. कोकणात जाणासाठी यंदा कोकण रेल्वेने 300 हून अधिक जादा गाड्या सोडल्या आहेत. या सर्व गाड्यांचे बुकींग फुल असून यांचे जनरल डबे देखील माणसांनी भरून जात आहेत. अनेकदा काही जणं ऐन वेळी गावचा प्लान बनवतात किंवा मग गौरी विसर्जनासाठी जायचे ठरवतात अशा लोकांसाठी कोकण रेल्वेने गणपती स्पेशल एक ट्रेन जाहीर केली आहे.
कोकण रेल्वे 8 सप्टेंबर रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुडाळ दरम्यान एक स्पेशल ट्रेन सोडणार आहे. या ट्रेनमध्ये 20 डब्बे असणार असून त्यात 14 जनरल डब्बे, 4 स्लीपर डब्बे व 2 सिटिंग कम लगेज रॅक असे डब्बे असणार आहेक. ही एक्सप्रेस 8 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 10.30 च्या सुमारास सुटणार आहे. तर कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता पोहचेल.
दुसऱ्या दिवशी ही ट्रेन कुडाळवरून सकाळी 10.30 ला सुटेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी 11.30 ला पोहचेल.