Kolkata Rape Case – कोलकात्यात भाजपच्या महिला नेत्याविरोधात गुन्हा दाखल, पिडीतेची ओळख उघड केल्याचा आरोप

कोलकात्यात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या एका महिला नेत्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात खोटी माहिती पसरलव्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन डॉक्टर आणि भाजप नेत्या लॉकेट चटर्जी यांना नोटीस बजावली आहे.

पीडित डॉक्टरवर शवविच्छेदन केल्यानंतर खोटी माहिती पसरवल्याबद्दल कोलकाता पोलिसांनी डॉ. सुबर्ण गोस्वामी आणि डॉ. कुणाल सरकार यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. डॉ सुबर्ण गोस्वामी यांनी आपल्याला कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे डॉ. कुणाल सरकार यांनी आपल्याला नोटीस मिळाल्याचे कबुल केले आहे.

भाजप महिला नेत्याला नोटीस

भाजप नेत्या आणि माजी खासदार लॉकेट चॅटर्जी यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. चॅटर्जी यांनी पीडित तरुणीची ओळख उघड केल्याबद्दल आणि तपासाबद्दल खोटी माहिती सांगितल्याबद्दल त्यांना तीन वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.