कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान लोकांकडून सातत्याने आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशनही बोलावले आहे. या अधिवेशनात बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देणारे विधेयक मांडले जाणार आहे. खर तर हिंदुस्थानासह इतर अन्य देशांमध्ये फाशीच्या शिक्षेला खूप विरोध झाला आहे आणि अनेक देशांनी ही शिक्षा रद्द केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक देशांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सध्या 55 देशांमध्ये फाशीची शिक्षा किंवा फाशीची तरतूद आहे. यापैकी 9 देश असे आहेत की जिथे अत्यंत गंभीर गुन्हा घडला तरच ही शिक्षा दिली जाते. मात्र अनेक देश फाशीच्या शिक्षेपासून दूर जात आहेत. जगात 112 देश असे आहेत जिथे फाशीची तरतूद नाही.
कोणत्या देशात दिला जातो सर्वाधिक मृत्यूदंड-
दरम्यान, चीनमध्ये जास्तीत जास्त फाशीची शिक्षा दिली जाते. 2022 च्या अहवालानुसार चीनमध्ये 1000 हून अधिक लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तसेच इराणमध्ये सुमारे 576, सौदी अरेबियामध्ये सुमारे 196, इजिप्तमध्ये सुमारे 24 आणि अमेरिकेत 18 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
ज्या देशात फाशीची शिक्षा दिली जाते तेथे फाशी देण्याची पद्धतही अगदी सामान्य आहे. यात गुन्हेगाराला गळ्यात दोरी बांधून फासावर लटकवले जाते आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. याशिवाय इतर देशांमध्ये इंजेक्शनद्वारे किंवा गोळ्या घालूनही फाशीची शिक्षा दिली जाते. सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करून मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. अमेरिकेतील एका प्रकरणात नायट्रोजन वायूद्वारे एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यालाही कडाडून विरोध झासा झाला.