Kolkata Rape Murder – आरोपीने केली आहेत चार लग्न, हिंसक वृत्तीमुळे तिघी सोडून गेल्या

कोलकात्यातील एका ज्युनियर महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय रॉय नवााच्या तरुणाला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत तपासादरम्यान संजय रॉयबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

संजय रॉय याच्या शेजाऱ्यांकडे त्याची चौकशी केली असता त्यांनी संजयची चार लग्न झाल्याचे माहिती पोलिसांना दिली आहे. ‘संजयने चार लग्न केली होती. मात्र त्याच्या हिंसक स्वभावामुळे त्याच्या तीन बायका त्याला सोडून गेल्या. तर चौथीचा गेल्या वर्षी कर्करोगामुळे मृत्यू झाला. संजय बऱ्याचदा रात्री दारू पिऊस तर्राट अवस्थेत घरी येतो’, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकात्यात आरजी. कर मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खुन करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्या गुप्तांगातून, डोळ्याांतून आणि नाकातून रक्त येत होतं. जेव्हा पिडीत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तिच्या नाकातून, डोळ्यांतून आणि गुप्तांगातून रक्त वाहत होतं. तिच्या पोटावर जखमा होत्या. पिडीत तरुणीवर शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा तिचे मानेचे हाड मोडल्याचे समोर आले. आरोपीने तरुणीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खुन केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.