विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोपरगाव मतदार संघात श्रेय वादावरून राजकारण तापले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमीत्त बॅनरबाजी करण्यात आली होती. गेल्या साडेचार वर्षांमध्ये 3000 कोटी रुपये निधी आणून विकास केल्याचे बॅनरमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यावरून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या एका कार्यकर्त्याने आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीका केली होती.
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामधील कार्यकर्त्यांमध्ये कोपरगावमध्ये आलबेल नसल्याचं दिसत आहे. कोपरगाव मतदार संघातील काळे-कोल्हे यांच्यामध्ये जुना वाद आहे. मात्र सध्या दोघेही महायुतीमध्ये आहेत. अशातच आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या बॅनर बाजीवरून महायुतीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावात गेल्या साडेचार वर्षात 3000 कोटी रुपये निधी आणून विकास केल्याची बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरबाजीवरून चांगलाच वाद पेटला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या एका कार्यकर्त्याने श्रेयासाठी आमदार आशुतोष काळे यांची चाललेली धडपड केवळ हस्यास्पद असल्याची जळजळीत टीका केली. या टीकेचा आमदार काळे यांनी चांगला समाचार घेत स्नेहलता कोल्हेंवर पलटवार केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्पी कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांच्यात श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कोपरगावातील राजकारण चांगलेच तापले आहे.