नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

Krishna Andhale claims to have been seen in Nashik

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा अ‍ॅड. गीतेश बनकर यांनी केला आहे. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. सीआयडीने त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर केले आहे. मागील महिन्यात तो नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा होती. आज बुधवारी सकाळपासून पुन्हा ही चर्चा रंगली आहे. गंगापूर रोडवरील विसे चौकात सुयोजित गार्डनच्या दत्त मंदिराजवळ तो एका मोटारसायकलवर त्याच्या साथीदाराबरोबर मागे बसलेला दिसल्याचा दावा अ‍ॅड. गीतेश बनकर यांनी केला आहे. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट, तर साथीदाराने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास हे दोघे मोटारसायकलने मखमलाबादच्या दिशेने गेले.

Krishna Andhale claims to have been seen in Nashik, police begin search

कृष्णाने तोंडावरील मास्क हटविल्यानंतर त्याला ओळखले, काही मिनिटातच मी गंगापूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली, असे गीतेश बनकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. नाशिक पोलिसांनी या माहितीवरून कृष्णा आंधळेचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही तपासणीबरोबरच शोधासाठी विशेष पथके पाठविण्यात आली. शहरासह संशयित ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस पथक शोध घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)