कुर्ला बेस्ट बस अपघात, आरोपी चालकाला जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला बस अपघातातील आरोपी चालकाला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन कर्मचाऱयाच्या हाती इलेक्ट्रिक बस चालवायला देणे ही नियुक्ती करणाऱयांची चूक असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी चालक संजय मोरेचा जामीन अर्ज मंजूर केला.

कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्टच्या एसी बसने वाहनास व तेथील काही नागरिकांना धडक दिली. या अपघातात नऊ जणांचा बळी गेला, तर 42 जण जखमी झाले. या प्रकरणी बस चालक संजय मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर मोरे यांनी अॅड. अद्वैत शुक्ल, अॅड. नितू सिंह आणि अॅड. अमनदीप सिंह सरा यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.