
लोकलमध्ये बसण्याच्या सीटच्या वादातून प्रवाशावर दगडफेक करणाऱयाला अखेर वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. योगेंद्र बोद्धा असे त्याचे नाव आहे.
जखमी निशांत खात्री हे दादर येथे राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी अंधेरी येथून दादरला जाणारी जलद गतीची लोकल पकडली. तेव्हा लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जागेवरून वाद झाला. रात्री अकरा वाजता लोकल वांद्रे स्थानकात फलाट क्रमांक 5 वर आली. त्यानंतर एक प्रवासी हा पटरीमध्ये उतरला. त्याने पटरीमधून दगड उचलून त्या प्रवाशाच्या दिशेने भिरकावला. तो दगड त्या प्रवाशाला न लागता निशांत याच्या डोळ्याला लागला. या घटनेची माहिती समजताच वांद्रे रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या पथकातील अधिकाऱयांनीसापळा रचून योगेंद्रला अटक केली.


























































