
हल्लीचा जमाना इतका फास्ट आहे की, एखादा नवा ट्रेंड कधी येतो आणि कधी जातो हेही कळत नाही. ‘लबुबू डॉल’ यास अपवाद ठरली आहे. भलंमोठं डोकं, बाहेर आलेले दात, टोकदार कान, बटबटे डोळे, विकट हास्य आणि एकूणच कुरूप चेहऱयाची ही बाहुली बऱयाच काळापासून आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. कोणीतरी ही बाहुली साम्यवादाचे प्रणेते व विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या दफनस्थळी ठेवली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. भांडवलवादाचे प्रतीक असलेली ही बाहुली मार्क्सच्या दफनस्थळी ठेवणे ही चेष्टा असल्याचं बोललं जातंय.