दक्षिण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या रद्द

3837

कोकणातील दक्षिण रेल्वे मार्गावर पाडी – कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत. 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 12201 गरीब रथ एक्सप्रेस, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 16338 ओखा एक्सप्रेस, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 22634 निझामुद्दीन – त्रिवेन्द्रम एक्सप्रेस, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 19578 जामनागर तिरुनेलवेली एक्सप्रेस,

24 ऑगस्ट रोजी सुटणारी 22653 त्रिवेन्द्रम-निझामुद्दीन एक्सप्रेस, 24 ऑगस्ट रोजी सुटणारी 16337 ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 12431 राजधानी  एक्सप्रेस शोरनुर – इरोड मार्गे, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 19331 कोचुवे इंदूर एक्सप्रेस शोरनुर – इरोड मार्गे, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 12618 मंगला एक्सप्रेस मडगाव नंतर हुबळी – लोंढा  मार्गे, 23 ऑगस्ट रोजी सुटणारी व त्याच दिवशी कोकण रेल्वे मार्गे जाणारी 16345 नेत्रावती एक्सप्रेस मडगाव नंतर हुबळी – लोंढा  मार्गे व 23 ऑगस्ट रोजी सुटणारी 19262 पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेस मडगाव नंतर हुबळी – लोंढा मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या