
2025 मधील शेवटचे सूर्यग्रहण हे येत्या 21 सप्टेंबरला दिसणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार हे ग्रहण रात्री 11 वाजता सुरू होऊन 22 सप्टेंबरच्या सकाळी 3.24 वाजेपर्यंत चालू राहील. याचाच अर्थ हे सूर्यग्रहण जवळपास 4 तास 24 मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण न्यूझीलंड आणि अंटार्क्टिकाच्या भागात तसेच दक्षिण महासागरात दिसेल. सूर्यग्रहणावेळी हिंदुस्थानात रात्र असेल. यामुळे हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. तसेच अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमधील लोकही सूर्यग्रहण पाहू शकणार नाहीत. दरम्यान, सप्टेंबरमधील सूर्यग्रहणाच्या आधी 2025 मधील चंद्रग्रहणही 7 सप्टेंबरला लागणार आहे.