वयाच्या 90 व्या वर्षी लतादीदी इन्स्टाग्रामवर!

357

गेली सात दशके आपल्या सुमधुर आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणाऱया भारतरत्नगानसम्राज्ञी लता मंगेशकर आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना भेटणार आहेत. दीदींनी आज इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट उघडले. वयाच्या 90व्या वर्षी इन्स्टाग्रामवर पदार्पण करणाऱया दीदींचे जगभरातून स्वागत होत आहे. अकाऊंट उघडल्यावर अवघ्या तासाभरात दीदींचे तब्बल 47 हजार फॉलोअर्स झाले.

गेल्या काही वर्षांपासून लतादीदी ट्विटरवर चांगल्याच सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर आल्यावर लतादीदींनी आपल्या आईवडिलांच्या फोटोचा अल्बम शेअर केला. त्यासोबत नमस्कार! आज पहेली बार आप सबसे इन्स्टाग्राम पे जुड रहीं हूंअसे दीदींनी लिहिलंय. त्यानंतर त्यांनी बहीण उषा मंगेशकर आणि मीना खडीकर यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. मीना खडीकर यांचे आत्मवृत्त मोठी तिची सावलीहे गेल्या वर्षी प्रकाशित झाले. त्याचा हिंदी अनुवाद काल दीदींच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आला.  या पुस्तकाचे नाक दीदी और मैंअसून हे पुस्तक हातात घेऊन काढलेला एक फोटो लतादीदींनी आपल्या इन्स्टा अकाऊंटकर शेअर केला आहे. हे फोटो सोशल मीडियाकर व्हायरल झाले असून लतादीदींकर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दीदी गेल्या काही वर्षांपासून ट्विटरवर सक्रिय आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या