जगभरातील घडामोडी

शिनावात्रा थायलँडच्या नव्या पंतप्रधान

पैतोंगर्तान शिनावात्रा यांनी थायलँडच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शिनावात्रा या देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान असून त्या थायलँडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. 37 वर्षीय पैतोंगतार्न या थायलँडच्या माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची सर्वात छोटी मुलगी आहे. वडिलांशिवाय, त्यांची काकी यिंगलक या सुद्धा थायलँडच्या पंतप्रधान होत्या. थायलँडमधील लोकांनी जे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी काम करणार आहोत, असे शिनावात्रा यांनी यावेळी म्हटले.

52 दिवसांनंतर अमरनाथ यात्रेचा समारोप

हिंदू धर्मातील पवित्र स्थळांपैकी एक असलेली अमरनाथ यात्रा आज रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात सोमवारी संपली. 29 जून 2024 पासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा तब्बल 52 दिवस चालली. देश विदेशातील भाविकांनी अमरनाथ यात्रेत सहभाग घेतला. यावर्षी जवळपास 5 लाख भाविकांनी अमरनाथ गुंफेचे दर्शन घेतले. पहलगाम येथून तीर्थ यात्रा गुंफा या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांना 46 किलोमीटरपर्यंत वर डोंगरावर चढावे लागते.

शेअर बाजाराची थंड सुरुवात

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर मार्केट थंड राहिला. सेन्सेन्स, निफ्टीचे फ्लॅट क्लोजिंग झाले. मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्समध्ये वाढ दिसून आली. मेटल, तेल, गॅस, एनर्जी शेअर्स वधारले. पीएसई, आयटी सेक्टर, फार्मा इंडेक्समध्ये वाढ झाली. ऑटो, बँकिंग क्षेत्रांवर मात्र दबाव होता. दिवसभरात निर्देशांक 12.16 अंकांनी म्हणजे 0.02 टक्क्यांनी घसरून 80,424 वर बंद झाला, तर निफ्टी 31.50 अंकांनी घसरून 24,572 बंद स्थिरावला.

हिरो मोटो कॉर्पला जीएसटीची नोटीस

दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटो कॉर्पला दिल्ली जीएसटी अधिकाऱ्यांनी 17 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली आहे. नोटीसनुसार 9,38,66,513 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच व्याज म्हणून 7,32,15,880 रुपये आणि दंड म्हणून 93,86,651 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कंपनीकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही. कंपनीने जीएसटीच्या कायद्यानुसार योग्य दावा केला होता. नोटीसविरोधात कंपनी योग्य पावले उचलेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.