‘सीएसएमटी’चे दोन प्लॅटफॉर्म तीन महिने बंद राहणार

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामासाठी प्लॅटफॉर्म क्र. 16 व 17 हे दोन प्लॅटफॉर्म पुढील तीन महिने बंद राहणार आहेत. मध्य रेल्वेने 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेससह अनेक मेल/एक्स्प्रेस दादर स्थानकातून सुटणार आहेत. मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.