
लातूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रारीवरून देवणी पोलिसात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवणी तालुक्यातील इंद्राळ येथे ही घटना घडली असून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रात्री झोपेत असताना नराधम बाप मुलीजवळ गेला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी मुलगी ओरडल्याने आई जागी झाली आणि मुलीकडे धावली. यावेळी मुलीच्या मदतीसाठी आलेल्या आईलाही नराधमाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर नराधम तेथून पळून गेला.
महिलेने पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दाखल केली. देवणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. धोंडिबा मुरारी कांबळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.