Latur News – लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, सरवडी येथे गारपीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील कांही भागात अवकाळी पाऊस झाला. निलंगा तालूक्यातील सरवडी परिसरात आणि देवणी तालूक्यातील काही भागात गारपीट झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरु झालेला आहे. दुपारी निलंगा तालूक्यातील सरवडी परिसरात गारांचा पाऊस झाला. देवणी तालूक्यातही सायंकाळी ५ नंतर अवकाळी पावसाने तडाखा दिला. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

करडी, हरभरा, ज्वारी, चिया या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणे आंबा, चिंच, चिकू अशा पिकांचेही नुकसान झाले आहे. जवळपास तासभर चांगला पाऊस झाला.हवामान खात्याच्यावतीनेही वादळी वार्‍यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.