परदेशात गाजतोय लातूरच्या तरुणाचा चित्रपट, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’चा गौरव

‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानंतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्येही ऊत चित्रपटाचा डंका वाजतोय. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार ‘ऊत’ने पटकावला आहे. यानिमित्ताने लातूरचा अभिनेता आणि या चित्रपटाचे निर्माता राज मिसाळ याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ‘ऊत’ला मिळत असलेला प्रतिसाद आणि विविध पुरस्कारांची पोचपावती भारावून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया राज मिसाळ याने दिली.