
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. जगात जे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्या 10 टॉपमध्ये 9 जण हे एकटय़ा अमेरिकेचे आहेत. तर केवळ एक जण फ्रान्सचा व्यक्ती आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सने जाहीर केलेल्या यादीतून ही माहिती समोर आली आहे. एलिसन यांच्या नेटवर्थमध्ये 10.3 अब्ज डॉलरची जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती आता 246 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 54.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 67.2 कोटी डॉलरची घसरण झाली आहे. यामुळे त्यांची संपत्ती 241 अब्ज डॉलरवर आली आहे. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत.
टॉप 10 श्रीमंत व्यक्ती
एलॉन मस्क 361 बिलियन अमेरिका
मार्क झुकरबर्ग 252 बिलियन अमेरिका
लॅरी एलिसन 246 बिलियन अमेरिका
जेफ बेजोस 241 बिलियन अमेरिका
बिल गेट्स 175 बिलियन अमेरिका
स्टिव्ह वॉल्मर 170 बिलियन अमेरिका
बर्नार्ड अरनॉल्ट 162 बिलियन फ्रान्स
लॅरी पेज 162 बिलियन अमेरिका
सेरजे ब्रीन 152 बिलियन अमेरिका
वॉरेन बफे 144 बिलियन अमेरिका