मुंबई पालिकेने अनेक वर्षांपासून भाडेपट्ट्याने दिलेल्या 227 भूखंडांमधील तब्बल 110 भूखंडांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण झाले नसल्याने पालिकेचा कोटय़वधीचा महसूल बुडत आहे. 117 भूखंड भाडेपट्टय़ाच्या नूतनीकरणाविना आहेत. या भूखंडांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे पालिकेने या भूखंडांबाबत कार्यवाही करण्याच्या हालचाली न केल्यास पालिकेचा ताप आणखी वाढणार आहे.
पालिका आणि राज्य सरकारने 4177 भूखंड भाडेपट्टा/मक्त्याने दिले आहेत. अत्यंत अल्प दरात हे भूखंड पालिकेने दिले आहेत. मात्र यातील अनेक भूखंडांच्या भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण रखडले आहे. यातील अनेक भूखंडांवर आता अतिक्रमण झाले आहे. याआधी 90 वर्षांच्या कालावधीसाठी भूखंड भाडेकरारावर दिले जात होते. जुन्या धोरणानुसार नाममात्र भाडय़ाने भूखंड मक्त्याने दिले जात होते. मात्र पालिकेने आता नवीन धोरण तयार केले आहे. मात्र प्रत्यक्षात नव्या धोरणानुसार भाडेपट्टय़ांचे नूतनीकरण झाले नसल्याने पालिकेचा महसूल बुडत आहे.
असे आहे धोरण
z अनुसूचित व्ही, अनुसूचित एक्स, अनुसूचित वाय, अनुसूचित झेड आणि महापालिका अशा प्रकारे 4 हजार 177 भूखंड 99 ते 100 वर्षे कालावधीसाठी भाडेकरारावर देण्यात आलेले आहेत. यातील 99 वर्षांपर्यंतचे भाडेकरार असलेले काही भूखंडांचे भाडेकरार संपले आहेत. z महापालिकेच्या ठराव क्रमांक 431 च्या मंजूर धोरणानुसार पालिकेच्या मालकीच्या मक्ता भूभागांच्या भाडेपट्टा कालावधीचे नूतनीकरण करण्यात येते. नूतनीकरण करताना त्यावरील अतिक्रमण काढणे आवश्यक असते.
z नव्या धोरणानुसार विकसित जागेच्या प्रचलित मुद्रांक शुल्क सिद्धगणक दरानुसार येणाऱ्या जमिनीच्या बाजारमूल्यानुसार भुईभाडे आकारले जात आहे. अशा भूखंडांचे 30 वर्षांच्या कालावधीसाठी नूतनीकरण केले जाणार आहे.