
लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा असलेल्या ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्र्ाज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे राहत्या घरी निधन झाले. त्या 80 वर्षी होत्या. अंतराळशास्त्र्ाज्ञ जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे तीन कन्या, पती, नातवंडे असा परिवार आहे.
गेले काही महिने डॉ. मंगला नारळीकर यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्र्ाज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली होती. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र्ा आणि खगोल भौतिक पेंद्रात (आयुका) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर दुपारी वैपुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगायच्या. डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत.




























































