
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना विधिमंडळ विशेषाधिकारी समितीने 30 दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा सुनावण्याची शिफारस केली आहे. अहिल्यानगर जिह्यातील जामखेड येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषदेचे एकूण कामकाज, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. याबाबत हिवाळी अधिवेशनात भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर व आमदार श्रीकांत भारतीय यांनी मोरे यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता.






























































