इंदापूरच्या फॉर्च्युन डेअरीचा परवाना रद्द; आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याचे प्रकरण

मुंबईमधील मालाड येथील आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यम्मो पंपनीला पुरवठा करणाऱया इंदापूर, गाझियाबाद आणि पुणे येथील पंपन्यांचा परवाना (अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआयने) रद्द केला आहे. पुढील निर्णय होईपर्यंत उत्पादन थांबविण्याच्या सूचना केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, आईस्क्रीम नक्की कोणत्या ठिकाणाहून आले, याबाबत मात्र निश्चित माहिती अद्यापही उपलब्ध होऊ शकली नाही.

मुंबई मालाड येथील एका महिलेने यम्मो कंपनीचे आईस्क्रीम ऑनलाइन मागवल्यानंतर त्या आईस्क्रीममध्ये मानवाचे बोट आढळून आले होते. यम्मो पंपनी इंदापूर, गाझियाबाद आणि पुणे येथील कंपनीमधून आईस्क्रीम घेते. मानवी बोट आढळलेले आईस्क्रीम कुठल्या पंपनीतून आले होते, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना ‘एफएसएसएआय’कडून देण्यात आल्या आहेत.

फॉर्च्युन डेअरी 2020 पासून कार्यरत आहे. या माध्यमातून दोन ते अडीच लाख लिटर दूध संकलित केले जाते व त्याच्यापासून दूध भुकटी व बटर तयार केले जाते. गेल्या वर्षीपासून या ठिकाणाहून आईस्क्रीम बनविण्याचे काम चालू आहे. वाल्को कंपनीच्या यम्मो ब्रँडला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न यामागे असल्याची शक्यताही वर्तविली असल्याचे फॉर्च्युन डेअरीचे संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

सदर घटनेमुळे पोलीस चौकशी सध्या सुरू करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे ‘एफएसएसआय’चे पथकदेखील इंदापूर येथे आले होते. त्यांनी सदर पंपनीचा परवाना रद्द केला आहे. यम्मो पंपनीला आमच्यासह गाजियाबाद आणि पुणे येथे आईस्क्रीमचा पुरवठा होतो. मुंबईत ऑनलाइन मागविलेल्या एका आईस्क्रीमच्या पॅकमध्ये मानवी बोट सापडल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर हे आईस्क्रीम नक्की कोणत्या ठिकाणाहून आले होते, याबाबत अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ‘एफएसएसएआय’ने केलेल्या सूचनेवरून आम्ही उत्पादन थांबवले आहे.
– मनोज तुपे,
फॉर्च्युन डेअरी, इंदापूर