
भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, हलका पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी दिल्लीकरांची पहाट गारव्याने झाली; शहराच्या अनेक भागांत, तसेच लगतच्या उत्तर प्रदेशातील नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणामधील गुरुग्रामसारख्या भागात पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी सकाळी ६ वाजता IMD ने शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तासांत दिल्लीतील अनेक ठिकाणी — इंडिया गेट, अक्षरधाम, पालम, सफदरजंग, लोदी रोड, नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, वसंत विहार, आर.के. पुरम, डिफेन्स कॉलनी, लाजपत नगर, वसंत कुंज, हौज खास, मालवीय नगर, कालकाजी, मेहरौली, तुघलकाबाद, छत्तरपूर, IGNOU, आयानगर आणि डेरामंडी — हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता होती. या पावसासोबतच हलकी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी/तास) वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. दिल्ली एनसीआरच्या काही भागांमध्ये प्रकारच्या हवामानाची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे.
07/04/2026: 06:10 IST; Light to moderate rainfall accompanied with light thunderstorm and lightning (30-40 Km/h gusty winds) is likely to occur at many places of Delhi and NCR. pic.twitter.com/hW5iOEB0jw
— India Meteorological Department (@Indiametdept) April 7, 2026

























































