
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या एनडीए सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्यांची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे दहाव्यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीश कुमार पहिल्या पाचातही नाहीत. सध्या ते आठव्या स्थानावर आहेतच. अर्थात त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यास यात बदल होऊ शकतो. पण सध्याच्या घडीला पहिले पाच नेते कोण आहेत, ते जाणून घेऊया…
1. पवन कुमार चामलिंग –

पहिल्या स्थानावर पवन कुमार चामलिंग असून त्यांनी 25 वर्षाहून अधिक काळ सिक्कीमचे मुख्यमंत्री पदा सांभाळले. 12 डिसेंबर 1994 ते 26 मे 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री होते.
2. नवीन पटनायक –

दुसऱ्या स्थानावर नवीन पटनायक आहेत. 5 मार्च 2000 ते 11 जून 2024 असे जवळपास 24 वर्ष ते ओडिशाचे मुख्यमंत्री होते.
3. ज्योती बसू –

तिसऱ्या स्थानावर ज्योती बसू असून त्यांनी 21 जून 1977 ते 5 नोव्हेंबर 2000 अशी 23 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.
4. गॅगाँग अपांग –

चौथ्या स्थानावर गेगाँग अपांग असून त्यांनी 18 जानेवारी 1980 – 19 जानेवारी 1999, 3 ऑगस्ट 2003 – 9 एप्रिल 2007 असे 22 वर्षाहून अधिक काळ अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.
5. लाल थनहलवा –

पाचव्या स्थानावर लाल थनहावला असून ते 5 मे 1984 – 21 ऑगस्ट 1986; 24 जानेवारी 1989 – 3 डिसेंबर 1998; 11 डिसेंबर 2008 – 15 डिसेंबर 2018 अशी 22 वर्ष मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते.


























































