
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएला मोठा धक्का बसला आहे. छपरा जिह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघाची जागा गमावली आहे. मढौरा येथून लोक जनशक्ती पक्षाकडून भोजपुरी चित्रपट कलाकार सीमा सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.
मढौरा मतदारसंघात एनडीए आणि महाआघाडीत थेट लढत होणार होती. सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. येथे आता राजद आणि जनसुराज पक्ष यांच्यात होईल.
जेडीयून ऐनवेळी उमेदवाराचे तिकीट कापले
जेडीयूकडून अमौर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेल्या सबा जफर यांचे तिकीट ऐनवेळी कापून माजी राज्यसभा सदस्य साबीर अली यांना उमेदवारी दिली आहे.