Lok Sabha Election 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून मिंधे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांना 578047 मतं मिळाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांचा पराभव झाला आहे.

हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेच्या वैशाली दरेकर आणि मिंधे गटाचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा 2009-14 आनंद प्रकाश परांजपे शिवसेना
सोळावी लोकसभा 2014-19 श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना
सतरावी लोकसभा 2019-24 श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना (शिंदे गट)