देशाला मोदी – शहा नकोत

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशाला मोदी-शहा नकोत हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेचा हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता आणि देशातील तळागाळातील लोकांनी मतदान करून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवली आहे. देशातील वंचित आणि गरीब जनता त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी भारताच्या पाठीशी उभी असल्याचे लोकसभेच्या निकालातून दिसून आले, असे कॉँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. मी दोन्ही जागांवर जिंकलो आहे. मी रायबरेली आणि वायनाडच्या लोकांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कोणत्या जागेवर राहणार हे मी विचारून ठरवीन, असे राहुल गांधी म्हणाले.

रायबरेली आणि वायनाडमधून दणदणीत विजय

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला आहे. रायबरेलीत राहुल गांधी यांनी भाजप उमेदवार दिनेश प्रतापसिंह यांचा तब्बल 4 लाख मतांनी पराभव केला. वायनाड मतदारसंघातही राहुल गांधींनी साडेतीन लाख मतांनी विजय मिळविला आहे.