
अनेक कामांसाठी आजकाल आधार कार्ड लागते. सरकारी किंवा बिगर सरकारी कामांसाठी एवढेच काय तर मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठीदेखील आधार कार्ड लागते.
आधार कार्ड हरवले तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे आधार क्रमांक नसला तरीही तुम्ही तुमचे ई-आधार मोबाईल किंवा संगणकावरून डाऊनलोड करू शकता.
UIDAI च्या वेबसाईटवरून तुम्हाला आधार कार्ड पुन्हा मिळविता येईल. ज्यांचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी आधारशी लिंक आहे, ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
वेबसाईटवर My Aadhar या सेक्शनमध्ये तुम्हाला हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी आणि जन्मतारीख ही माहिती भरा.
तुम्हाला OTP प्राप्त होईल. तो भरून सबमिट केल्यावर तुम्हाला आधारची माहिती दिसेल. तेथे तुम्ही ई-आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.































































