एलपीजीचा वापर 13 टक्क्यांनी घटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला होता. परिणामी मार्च महिन्यात देशाच्या स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) वापर तब्बल 13 टक्क्यांनी घटला. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलने एलपीजी वापराची आकडेवारी जाहीर केली आहे. मार्चमध्ये एलपीजीचा वापर 2.379 दशलक्ष टन होता. गेल्या वर्षी याच कालावधीत हा वापर 2,729 दशलक्ष टन एवढा होता. यावर्षी एलपीजी वापरामध्ये 13 टक्के घट झाली आहे. इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होती. याचा परिणाम पुरवठय़ावर झाला होता. मार्चमध्ये वापर घटला तरी, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एलपीजीचा एकूण वापर 6 टक्क्यांनी वाढून 33,212 दशलक्ष टन झाला आहे.