गरबा खेळताना हिंदू नसलेल्या लोकांना मंडपात प्रवेश देऊ नये. त्याकरिता गरब्यासाठी मंडपात येणाऱया प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशातील इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी आज केले. हिंदूंचा गोमूत्र पिण्यात कोणताही आक्षेप नाही. इतकेच नाही तर टिळा न लावता आलेल्यांनाही गरबा मंडपात प्रवेश दिला जाऊ नये असेही ते म्हणाले. चिंटू वर्मा यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होते. वर्मा म्हणाले, गरबा मंडपात अनेक प्रकारचे लोक येत असतात. गर्दीमध्ये प्रत्येकाची ओळख पटवता येत नाही. यामुळे जो कोणी गरबा खेळण्यासाठी मंडपात येईल त्याला प्रवेश देण्याआधी गोमूत्र पाजले पाहिजे. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे.