
मध्य प्रदेशातील घनदाट जंगलातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 सध्या चर्चेत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्ंकग’चा देशातील पहिला प्रयोग करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उद्देश केवळ चालकांचा वेग कमी करणे नाही तर वन क्षेत्रात राहणाऱया वन्यजीवांची सुरक्षितता सुनिश्चित करणेदेखील आहे.
जंगलालगतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 तयार करताना दुबईतील एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रस्त्यावर पाच मिलिमीटर जाडीचे ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्ंकग’ लावण्यात आले. नौरादेही व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱया या मार्गाचा सुमारे 11.96 राष्ट्रीय महामार्ग किलोमीटरचा भाग दोन आणि चार लेनमध्ये विकसित करण्यात आला. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या घाटाच्या संवेदनशील वन्यजीव क्षेत्रात हे ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्ंकग’ लावण्यात आले आहेत. या परिसरात वेगाने येणाऱया वाहनांमुळे वाघ, बिबटय़ांसह हरीण, नीलगाय आणि इतर वन्यप्राण्यांचे रस्ते अपघात अनेकदा होतात. त्यामुळे या भागाला धोकादायक क्षेत्र मानले जात होते.
नवीन तंत्रज्ञान काय?
रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’ नाही, तर पाच मिलिमीटर जाडीच्या पांढऱया पेव्हर शोल्डर लाईन्स’देखील तयार करण्यात आल्या आहेत. वाहनचालकाला डुलकी लागली तर कंपनीमुळे त्यांना जाग येते. लाल रंग आधीच धोक्याचा सिग्नल मानला जातो. त्यामुळेही हे तंत्रज्ञान चालकांच्या मानसिकतेवर परिणाम करते. याशिवाय प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी 25 वन्यजीव भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाय देण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला.
























































