छिंदवाडात भीषण अपघात, बस आणि पिकअपच्या धडकेत 10 ठार, 30 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गुरुवारी रात्री भीषण अपघाताची बस घडली. सिमरिया हनुमान मंदिराजवळ प्रवासी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली.

बस छिंदवाडाहून भंडारकुंड या मार्गावर प्रवास करत होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींची प्रकृती लक्षात घेत प्रशासनाने तातडीने कारवाई करत सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयात त्वरित पोहोचवण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला सतर्क करण्यात आले आहे.