
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये दोन तरुणांनी हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावर गोळीबार केला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 719 वरील लोधी पेट्रोल पंपावर घडली. या गोळीबारात कर्मचारी जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू केला आहे. मध्य प्रदेशात हेल्मेट नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल दिले जात नाही.