महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती तातडीने करा

विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. त्यासंदर्भात भास्कर जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.