महाडीबीटीची वेबसाईट वारंवार होतेय हँग; मोफत बियाणांपासून शेतकरी राहणार वंचित

महाडीबीटीच्या केबसाईटकर शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, भुईमूग, तीळ व सूर्यफूल या बियाणांचे वितरण या वेबसाईटच्या माध्यमातून केले जाते. लाभधारक शेतकऱ्यांना मोफत किंवा अल्पदरात बियाणे मिळत असल्याने शेतकरी अर्ज करत असतात. मात्र, ही वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी विभागाच्या वतीने कृषी अवजारे, सिंचन साधने व सुविधांतर्गत ठिबक संच तसेच मोटर, पाईपलाईन, गळीतधान्य प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत तीळ, भुईमूग, सूर्यफुल व सोयाबीन बी-बियाणे, फलोत्पादन अंतर्गत फळबागांसाठी प्रोत्साहनपर योजना तसेच गोडाऊन, सौर कुंपणासह विविध शासकीय योजनांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते.

सध्या सोयाबीन पेरणीसाठी शेतांची मशागत सुरू आहे. यासाठी शेतकरी पेरणीसाठी बियाणे मिळकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कृषी किभागाच्या केबसाईटकर अर्ज करत आहेत. मात्र, महाडीबीटीच्या साईटवर शेतकऱ्यांची विस्तृत माहिती भरून घेतली जात आहे. यानंतर अर्जाची फी भरून घेतली जात आहे. पेमेंट झाल्यावर मात्र अर्जाचा तपशील पाहिला असता, कोणताही तपशील सापडला नाही, असा मेसेज दाखवत आहे. यामुळे पुन्हा कधीतरी आपला अर्ज स्कीकारला जाईल, या आशेकर शेतकरी पुन्हा पुन्हा पेमेंट करत आहेत. मात्र, अर्ज पुढे सरकत नसल्याने व कोणतीही माहिती दाखवत नसल्याने शेतकरी नाराज होत आहेत. यामध्ये अर्जाच्या माध्यमातून फीची लूट शेतकऱ्यांच्या माथ्याकर बसत आहे. शासनाच्या या साईटकरून सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या पैशाची लूट चालू आहे.

अर्ज जर दिसत नसेल तर शेतकऱ्यांनी भरलेले हे ऑनलाइन पैसे परत शेतकऱ्यांना देण्याची कोणतीही सुविधा नसल्याने अर्जाच्या पैशालाही मुकावे लागत आहे. याबाबत कृषी विभागाला माहिती दिल्यानंतरही त्यावर उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.