
हिंदू धर्मात भाद्रपदातील कृष्णपक्ष हा श्राद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात पुण्यात्म्यांचे स्मरण केले जाते. पहलगाममध्ये हिंदूंची धर्म विचारून हत्या केली, त्यांचे कुटुंबीय श्राद्ध करत असताना BCCI च्या नावाखाली हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना खेळवणे म्हणजे पहलगाममधील मृतांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमानच म्हणावा लागेल, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतृत्वात या क्रिकेट सामन्याच्या विरोधात ‘माझं कुंकू, माझा देश’ या आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यावर उतरून लोकांनी प्रचंड मोठा संताप व्यक्त केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या संवेदना मेल्या आहेत का अशा प्रकारचा सवाल लोक विचारत आहेत.
मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात हिंदुस्थानी संघाला क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. या सामन्याचा आणि नैतिकता विसरलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविवारी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन केले. या आंदोलनाला राज्यभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून राज्यातील रणरागिणी रस्त्यावर उतरल्या असून पंतप्रधान मोदी यांनी पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंदूर जमा झाले आहे.
देशभरात पितृपक्ष सुरू आहे. या काळात मृत्यू झालेल्या पुण्यात्मांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. मात्र, पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निरपराध व्यक्तींच्या कुटुंबियांचा आक्रोश थांबलेला नाही, ज्यांचे सिंदूर पुसले गेले, त्यांचे अश्रूही थांबलेले नाही. मात्र, सरकारला या सगळ्यांचा विसर पडला असून ते हल्ला करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचचे आयोजन करत आहेत. याबाबत फक्त महाराष्ट्रातच नाही तर दशेभरात संताप व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान- पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना खेळवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. याविरोधात शिवसेनेने रस्तायवर उतरून निषेध व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले जात आहे. याला रणरागिणींचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यभरात मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाममध्ये सांडलेल्या 26 निरपराधा लोकांचे बळी, या हल्ल्यात विधवा झालेल्यांचे सिंदूर आणि मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सरकार विसरले का? असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.
या सामन्याचा सोशल मिडीयावरही जोरदार निषेध करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर पहलगाम हल्ल्याचे फोटो शेअर करत हा हल्ला आणि त्यात गेलेल्या 26 जणांचे बळी, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश, विधवांचे अश्रू याचा मोदी सरकारला विसर पडला का? असा संतप्त सवाल केला आहे. या सामन्याविरोधात संतापाची लाट असून काही जणांनी निषेध म्हणून टीव्हीसेट फोडल्याचे सोशल मिडीयावर दिसत आहे.
शिवसेनेकडून ‘माझं कुंकू, माझा देश’ हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूरच्या डब्या पाठवून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी आंदोलनसाठी मोठ्या संख्येने रणरागिणी जमल्या असून पाकिस्तान आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवले.
मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही जोरदार आंदोलन सुरु आहे. पुण्यात लाल महाल चौकात शिवसेनेच्या महिला आघाडीने आंदोलन केले. दहशतवादी हल्ल्यात अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचा कडाडून निषेध केला. छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेनेच्या महिला आघाडीने आंदोलन करत पंतप्रधान मोदींना सिंदूरचा डबा भेट देणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सहभागी झाले होते.
आता गरम सिंदूर आता थंड झाला का? असा संतप्त सवाल शिवसेना नेते,खासदार अरविंद सावंत यांनी केला. जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पहलगाम हल्यानंतर तुम्ही आलात पण तुम्ही तिकडे गेला नाहीत तर बिहारला गेलात. देशातले प्रतिनिधी गेले पण त्यांनी पाकिस्तान हा शब्द उच्चारला नाही, असे अरविंद सावंत म्हणाले.