मराठा आरक्षण आयोगाचा अहवाल शिफारशींसह स्वीकारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा आरक्षणाचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना सादर झाल्यावर आता आज रविवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल जसाच्या तसाच स्वीकारून पुढे त्याचे कायद्यात रुपांतर करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत झाल्याचे समजते.

मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करून मराठा समाजाला आरक्षण करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी सरकार सर्व शक्यता पडताळून पाहत आहे. आज दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठका सुरु होत्या. मुख्य सचिवांसह विधी व न्याय विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पण त्यापूर्वी रविवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल सादर होईल.