सर्वपक्षीय दिवाळी

251

विधानसभा निवडणूक निकालाचे वर्णन सर्वपक्षीय दिवाळी असेच करावे लागेल. कारण महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय इतर घटक पक्षांनीही विजयाचे कंदील लावले आहेत. शेकाप, समाजवादी पक्ष, मनसे आणि अगदी अपक्षांनीही अनपेक्षितरीत्या विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला आहे. वंचित बहुजन आघाडीला मात्र खाते उघडता आलेले नाही.

धक्के

पंकजा मुंडे (परळी)
परळी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या बहीणभावांची लढत रंगतदार ठरली. याच मतदारसंघातून आमदार होऊन मंत्री झालेल्या पंकजा यांचा धनंजय मुंडे यांनी यावेळी 30695 मताधिक्याने अनपेक्षितरीत्या पराभव केला.

रोहिणी खडसे (मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसला. खडसे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 1957 मतांनी

नरेंद्र मेहता (मीरा-भाईंदर)
युती झाली नाही तरी मीच जिंकून येणार अशा वल्गना करणारे भाजपचे नरेंद्र मेहता यांना मीरा-भाईंदरवासियांनी पराभवाची धूळ चारली. अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्या पदरात मतदारांनी 79 हजार 575 मतांचे दान टाकून त्यांना विजयी केले. मेहता यांचा त्यांनी 18 हजारांच्या मताधिक्याने पराभव करून त्यांचे गर्वहरण केले.

उदयनराजेंचा दारुण पराभव
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी त्यांना चारीमुंडय़ा चित केले. पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या