ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना ‘विठाबाई’ जीवनगौरव, ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांना ’किर्लोस्कर’ जीवनगौरव

454

राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तमाशा कलाक्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलावंतास हा पुरस्कार दिला जातो. 2018-19 सालच्या पुरस्कारासाठी गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड झाली आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाटय़ कलाकारास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2019-20 वर्षाच्या पुरस्कारासाठी मधुवंती दांडेकर यांची निवड झाली आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मधुवंती दांडेकर यांचा जन्म 23 मार्च 1947 रोजी पुण्यात झाला. दांडेकर यांनी अनेक नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. एकच प्याला, झाला महार पंढरीनाथ, देव दीनाघरी धावला, धुवाचा तारा, पती गेले गं काठेवाडी, मदनाची मंजिरी, मंदारमाला, मानापमान, संशयकल्लोळ, सुवर्णतुला या संगीत नाटकामध्ये त्यांनी काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या