
मी रानडुक्कर, साळिंदर असे प्राणी खाल्ले आहेत असा दावा अभिनेत्री छाया कदम यांनी केले होते. आता या विधानानंतर कदम अडचणीत सापडल्या आहेत. वनविभागाने छाया कदम यांची चौकशी सुरू केली आहे.
एका मुलाखातीदरम्यान अभिनेत्री छाया कदम म्हणाल्या होत्या की मी कुठलाही प्राणी खाते, रानटी डुक्कर, पिसई, घोरपड, ससा, साळिंदर असे प्राणी मी खाल्ले आहेत असे कदम यांनी एका मुलाखातीत म्हटले होते. यातील अनेक प्राणी हे वन्यजी संरक्षक यादीत येता. जेव्हा कदम यांनी हे विधान केले होते, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांना हे प्राणी पुरवले कोणी असा सवालही विचारला होता.
आता वनविभागाने कदम यांना फोन करून याबाबत विचारणा केली आहे. पण कदम सध्या कामानिमित्त बाहेर गेल्या असून चार दिवसांनंतर आपण भेटून सविस्तर आपली भूमिका मांडू असे कदम यांनी सांगितले आहे. दुसरीकडे वनविभागाने कदम यांना हे प्राणी कोणी पुरवले याचीही चौकशी सुरू केली आहे.