राज्यात उष्माघाताचे सात रुग्ण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाने चाळिशी गाठली असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात मार्चमध्ये उष्माघाताने बाधित झालेल्या सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात पालघरमध्ये दोन रुग्ण, तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड या जिह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मात्र, मुंबईत अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान, राज्यात मार्च 2025 मध्ये 30 जणांना, तर मार्च 2024 मध्ये 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.