राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला

विशाखापट्टणम येथे नुकत्याच पार पडलेल्या इक्युपड व क्लासिक राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचाच बोलबाला होता. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानातील तब्बल चारशेपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.  या स्पर्धेत महाराष्ट्राने 30 सुवर्ण, 7 रौप्य आणि 13 कांस्य पदकासह 50 पदके जिंकली. सतीश पाताडे यांनी बेंचप्रेसमध्ये तर देवदत्त भोईर यांना डेडलिप्टमध्ये सुवर्ण पदक जिंकले. सतीश पाताडे, डॉ. शर्वरी इनामदार, रुबी दास, नीता मेहता, विनुता रघुनाथ, रणजिता मिश्रा, देवदत्त भोईर, कांतीलाल टकले आणि अंकुश गाढवे यांना स्ट्राँग मॅन व वुमन ऑफ इंडिया या किताबाने  गौरविण्यात आले. सांघिक विजेतेपद महाराष्ट्राने संपादले. या स्पर्धेत मायलेकींनीही पदके जिंकण्याचा पराक्रम केला. आई डॉ. पूर्णा भारदे यांनी सुवर्ण तर कन्या डॉ. शर्वरी इनामदार हिने सुवर्ण पदकासह स्ट्रॉग वुमन किताब पटकावला.

इक्युपड गटातील पदक विजेते पुरुष

 सुवर्ण पदक विजेते- महेश पाटील, सतीश पाताडे, राजेश शेटये, कुंदन माने, उदय स्वामी, अशोक मते.

 रौप्य पदक विजेते- कांतीलाल टकले.

 कास्य पदक विजेते- जितेद्र यादव, प्रशांत जगताप, संजय शर्मा, राजहंस मेहंदळे, सलीम शेख

इक्युपड स्पर्धेतील पदक विजेत्या महिला

 सुवर्ण पदक विजेते- शीतल ताम्हाणे, डॉ. शर्वरी इनामदार, किरण त्यागी, वैशाली तांडेल, स्नेहा कर्नाले, गीतांजली दस्तूर, रुबी दास, डॉ. पूर्णा भद्रे.

 रौप्य पदक विजेते- अर्चना काळे, राजश्री पेडणेकर.

 कास्य पदक विजेते- सलमा शेख

क्लासिक स्पर्धेतील पदक विजेते पुरुष

 सुवर्ण पदक विजेते- महेश पाटील, राजेश शेटये, मनीष कोंड्रा, सनील अडसूळ, सुरेश बनसोडे, देवदत्त भोईर.

 रौप्य पदक विजेते- संतोष गावडे, अंकुश गाढवे, प्रशांत जगताप.

 कास्य पदक विजेते- प्रतीप जागडे, विनोद सातव, कांतीलाल टकले, अनिल कुमठेकर.

क्लासिक स्पर्धेतील पदक विजेत्या महिला

 सुवर्ण पदक विजेते- नीता मेहता, डॉक्टर शर्वरी इनामदार, रोहिणी सन्सल, मायानी कांबळे, स्नेहा कर्नाले, विनुता रघुनाथ, गीतांजली दस्तूर, रुबी दास, रंजिता मिश्रा आणि डॉक्टर पूर्णा भारदे.

 रौप्य पदक विजेते- वैशाली तांडेल.

 कास्य पदक विजेतेः मंजुश्री पुराणिक, भारती महापात्रा, मधुरा अंगत.