
एमआयटी कर्ल्ड पीस युनिक्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदतर्फे 19 ते 20 जुलै या कालावधीत ‘महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी (देवाची) येथील हनुमानवाडीमधील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे होणाऱया परिषदेत राज्यभरातील 60 कीर्तनकार व 150 सरपंच सहभागी होणार आहेत.
परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, यशोधन महाराज साखरे, एमआयटी युनिक्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शलिनी टोणपे, राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले यावेळी उपस्थित होते. एमआयटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे. 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. अन्न क औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनील खांडबहाले, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यावेळी उपस्थित राहणार आहेत.
20 जुलै रोजी होणाऱया ‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल’ या विषयावर होणाऱया सत्रासाठी माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्यमंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे, अभय टिळक उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायाची 21व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे.