
महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वात संतापाची लाट उसळली आहे. सासवड येथे होणारी मातीतील ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा अचानक रद्द झाल्याने पैलवान, वस्ताद आणि कुस्तीप्रेमी संतप्त झाले आहेत. मोठय़ा थाटामाटात घोषणा करून, आकर्षक पोस्टर लावून आणि मोठय़ा बक्षिसांचे आमिष दाखवूनही प्रत्यक्षात स्पर्धेची कोणतीही तयारी नसल्याचे उघड झाल्याने आयोजकांवर तीव्र टीका होत आहे.
12 मार्चपासून सासवड येथे प्रकाश जगताप प्रतिष्ठानतर्फे ही स्पर्धा होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पत्रकार परिषद घेऊन स्पर्धेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. कारसारख्या बक्षिसांचे फोटो पोस्टरवर झळकवून पैलवानांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात मैदानावर कोणतीही तयारी नव्हती. उभारलेला मंडपही 10 तारखेलाच काढून नेण्यात आला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक स्पर्धक पैलवानांना स्पर्धा रद्द झाल्याची अधिकृत माहितीही देण्यात आलेली नाही. स्पर्धा का रद्द करण्यात आली, याबाबत आयोजकांनी अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे कुस्तीविश्वात तीव्र नाराजी पसरली आहे.
कुस्तीच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठय़ा बक्षिसांची घोषणा करणे, पोस्टरबाजी करणे आणि शेवटी तयारीअभावी स्पर्धा रद्द करणे ही धोकादायक प्रवृत्ती वाढत असल्याची टीका होत आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ या प्रतिष्ठत स्पर्धेच्या नावाचा वापर करून पैलवानांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणाची




























































