Live- सरकार स्थापनेचा आमचा दावा अजूनही कायम – उद्धव ठाकरे

3345
 • गिरीष बापट यांच्या वक्तव्यावरही केली टीका
 • आमच्यात जे काही ठरेल, ते जगजाहीर होईल, आम्ही लपूनछपून काही करणार नाही
 • भाजप अडचणीत असताना लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो
 • भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्यानेच एकत्र येण्यात अडचणी आल्यात
 • त्यांच्या निर्णयानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एकत्र येण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल
 • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही मुद्द्यांवर चर्चा करतील
 • हिंदुत्त्व ही आमची विचारधारा असून आम्ही त्यावर ठाम आहोत.
 • खासदार अरविंद सांवत यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचे केले अभिनंदन
 • मित्रांच्या शुभेच्छांच्या स्वीकार करत आम्ही आमचा मार्ग निवडणार आहोत.
 • शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही एकत्र बसू आणि मग Common Minimum Program त्यावरती विचार करून आम्ही सरकार बनविण्यासाठी आमचा दावा कायम आहे तो पुढे नेऊ – उद्धव ठाकरे

 • चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडीबाबत आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत
 • ती माहिती देण्यासोबतच आम्ही कसे एकत्र आलो, हे आपण स्पष्ट करू
 • नीतीश आणि भाजप, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, चंद्राबाबू नायडू आणि भाजप हे एकत्र कसे आले याची माहिती मागवली आहे.
 • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात विचारधारेत फरक असताना हे एकत्र कसे येणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत
 • काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुदत मागितली होती
 • राज्यपाल खूप दयाळू आहेत. आम्ही 48 तासांची मुदत मागितली होती, त्यांनी सहा महिने दिले.
 • सरकार स्थापनेसाठी 48 तासांची मागणी करण्यात आली होती
 • सरकार बनवण्याचा आमचा दावा आजही कायम आहे

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
 • उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलणार याची प्रचंड मोठी उत्सुकता
आपली प्रतिक्रिया द्या