औषध निरीक्षकांच्या 109 पदांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) औषध निरीक्षकांच्या 109 पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती mpsc.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्समधील पदवी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये प्रति महिना पगार मिळेल. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार इतर भत्तेसुद्धा मिळतील.