राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. आता आणखी दोन दिवस राज्यात पाऊस मुसळधार बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या जोरदार पावसाने पुण्यातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच सातारा, पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरात शनिवारी दुपारपर्यंत पावसाचा चांगलाच जोर होता. आता आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी समुद्र किनारी येणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाला जोर असल्याने हाय टाईडची शक्यता आहे. समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी समुद्रकिनारी येणे टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात शनिवारी मुसळधार पाऊस झाल्याने अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेले होते. तसेच काही सखल भागात पाणी साचले होते. पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केली आहे. तसेच योग्य ती सतर्कता बाळगावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.